Home > Economics > नॉर्थ कोकण चेंबर ऑफ कॉमर्सच्या बोरीवली येथील नविन महिला आधार केंद्राचे उद्घाटन सोहळा आणि परिसंवाद.

नॉर्थ कोकण चेंबर ऑफ कॉमर्सच्या बोरीवली येथील नविन महिला आधार केंद्राचे उद्घाटन सोहळा आणि परिसंवाद.

loading...
नॉर्थ कोकण चेंबर ऑफ कॉमर्सच्या बोरीवली येथील नविन महिला आधार केंद्राचे उद्घाटन सोहळा आणि परिसंवाद.

नॉर्थ कोकण चेंबर ऑफ कॉमर्सच्या बोरीवली येथील नविन महिला आधार केंद्राचे उद्घाटन आणि आशिया खंडातील सर्वात मोठ्या सारस्वत बँकेच्या सहकार्याने लघु सूक्ष्म आणि मध्यम क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिला उद्योजकांसाठी परिसंवाद असा संयुक्त सोहळा दि. ९ ऑगस्ट २०२४ रोजी महिला आधार भवन, बोरीवली (प) मुंबई येथे थाटामाटात, आनंदात संपन्न झाला. याप्रसंगी उद्घाटक आमदार श्रीमती मनिषाताई चौधरी, प्रमुख अतिथी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अॅड अॅग्रीकल्चरचे अध्यश्र श्री ललित गांधी सोहळ्याचे अध्यक्ष चेंबरचे अध्यक्ष डॉ. दिपक चौधरी, प्रसिद्ध उद्योजक श्री नरेश राऊत, सारस्वत बँकेच्या महाप्रबंधक अक्षया सिंग, एम. एस. सी. बी. चे सुनिलजी या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. दिपक चौधरी अध्यक्ष यांनी उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले व मान्यवरांचा सत्कार केला. गेली बारा वर्षे उत्तर कोकण या भागातील उद्योजकांच्या महिलांच्या प्रगतीसाठी तसेच विविध व्यावसायिक समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे. उद्योगवाढीसाठी चर्चगेट ते बोर्डीपर्यंत लोकल सेवा सुरु करणे अत्यंत गरजेचे आहे. आमदार श्रीमती मनिषाताई चौधरी सर्वांचे आभार मानून आज ऑगस्ट क्रांती दिवस आहे. यावेळी महिला प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. महिलांनी उद्योजक व्हावे यास्तव सारस्वत बँक आर्थिक सहाय्य देणार आहेत. शासनाच्या विविध सेवा बाबत मार्गदर्शन करण्यात आले. श्री ललित गांधी महिलांना सक्षम करण्यासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. तसेच सारस्वत बँक सवलतीत कर्ज देणार आहे. या भागातील विकासासाठी आम्ही सहकार्य करु. आम्ही आपल्या सोबत राहू असे विचार व्यक्त करुन मोलाचे मार्गदर्शन केले व सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सारस्वत बँक, एम. एस. सी.बी., श्री विशाला चौधरी, (सीए), यांनी चित्रफितद्वारे मार्गदर्शन केले. यावेळी मनोहर चौधरी, डॉ. राजीव चुरी, सौ. स्मिता चौधरी, संघाचे उपाध्यक्ष प्रितम म्हात्रे, अनंत वर्तक, दीपा राऊत तसेच महिला व मान्यवरांची उपस्थिती होती. प्रसिद्ध उद्योजक श्री प्रकाशजी पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

loading...
loading...
Comments

Sponsored Ads

...
...
...
...
...
Economics

Category

Sports      Education      Weather      Entertainment      Politics      Business      Economics      Health      Sad Demise      Current Affairs      Festive      Achievements     
Recent News

logo
Download our app by clicking the link below :
logo logo
© 2024 SKS Connect | All Rights Reserved | Powered By OTET Infosystems