सोमवंशी क्षत्रिय समाज महामंडळाचे ट्रेड फेअर चे आज शुक्रवार सकाळी १०:०० वाजता वसई विकास बँकेचे चेअरमन श्री आशय राऊत यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन झाले. समाज मंदिराचे चेअरमन श्री नितीन म्हात्रे यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी महामंडळाचे अध्यक्ष श्री नरेंद्र राऊत यांनी सर्वांचे स्वागत केलं. असे विकास बँकेचे माजी चेअरमन जगदीश राऊत, माजी चेअरमन सुरेश चौधरी, बँकेचे व्हाईस चेअरमन शिरीष राऊत, समाज मंदिराचे मॅ. ट्रस्टी केवल वर्तक, विश्वस्त सुभाष चौधरी, प्रशांत वर्तक, राजेश वर्तक, प्रमुख कार्यवाह अरविंद म्हात्रे, कार्याध्यक्ष मिलिंद म्हात्रे, खजिनदार पंकज वर्तक , उपाध्यक्ष सौ हेमलता राऊत, संचालक रमेश पाटील, प्रफुल म्हात्रे असे अनेक मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमात जवळपास १०२ स्टॉल धारकांनी भाग घेतला आहे. हे ट्रेड फेअर शुक्रवार, शनिवार-रविवार असे तीन दिवस चालणार आहे. नवउद्योजकांना उद्योगाची संधी म्हणून महामंडळ हा उपक्रम सर्वांसाठी राबवित आहे.