 
                            काल शुक्रवार दि २७/६/२५ रोजी रात्री १०.००वाजेच्या दरम्यान केबल लाईन टाकणारी यंत्र सामग्री घेऊन जात असलेला टेंपोचा माहिम येथील हिरकमल पेट्रोलपंपा समोरील विद्युत तारेला स्पर्श झाला.त्यावेळी टेंपो मधील एका व्यक्तीला शॉक लागून तो चिकटलेल्या अवस्थेत होता.तेथे उपस्थित असलेल्या श्री समित विनोद म्हात्रे यांनी सर्वांना त्या व्यक्तीला डायरेक्ट स्पर्श न करण्याच्या सूचना दिल्या.त्याच वेळी तेथेच उपस्थित असलेल्या श्री हिंदेश प्रफुल्ल पाटील ( केळवे)याने प्रसंगावधान तसेच हिंमत दाखवत प्लास्टिक खुर्चीने त्या चिकटलेल्या व्यक्तीला सोडविले. ती व्यक्ती त्या वेळी गंभीर स्थितीत होती. समित म्हात्रे यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले व सर्वांनी मिळून त्याला तात्काळ माहिम येथील आरोग्य केंद्रात दाखल केले.तेथे असलेल्या डॉ मृण्मयी मयेकर यांनी त्याच्यावर लगेचच उपचार केले.थोड्यावेळाने ती व्यक्ती शुद्धीवर आली नंतर त्याला पुढील उपचारासाठी धुंदलवाडी येथे पाठविण्यात आले.आता त्याची प्रकृती सुधारत आहे. समित म्हात्रे व हिंदेश पाटील यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे आज त्या कामगाराचा जीव वाचला.🙏🏻 दोघांचेही त्यांच्या धाडसाबद्दल आणि उत्स्फूर्त कृतीबद्दल समाजात कौतुक होत आहे. शाब्बास आणि असेच चांगले काम करत राहा. शुभेच्छा.