गुरुने दिला ज्ञानरूपी वसा! आम्ही चालवू हा पुढे वारसा!! माननीय दत्तोपंत बर्वे यांच्या प्रेरणेने सुरू झालेला *बर्वे कृतज्ञता स्मृती* हा तालुक्यातील निवृत्त शिक्षकांचा ऋणनिर्देश *महर्षी व्यास स्मृती समारंभ* या नावाने गेली 38 वर्ष संपन्न होत आहे. समाज मंदिर ट्रस्ट च्या चाळीसाव्या वर्षपूर्ती निमित्त सुरू असलेल्या अनेक कार्यक्रमाचा शिरोमणी म्हणजे *शनिवार दि. 10 ऑगस्ट 2024* रोजी संपन्न झालेला ज्ञानदानाचे पवित्र कार्य करून निवृत्त झालेल्या शिक्षकांचा ऋणनिर्देश समारंभ. दुपारी 4.30 वा. समाज मंदिर ट्रस्ट वसईच्या सभागृहात सन्माननीय *तहसीलदार डॉ.अविनाश कोष्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत बाजीपुर वनिता विनयालयाचे माजी प्राचार्य सुरेश चौधरी सर यांच्या अध्यक्षतेखाली चेअरमन नितीन म्हात्रे, मॅनेजिंग ट्रस्टी केवल वर्तक, माजी चेअरमन जगदीश राऊत, महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र राऊत, महामंडळाच्या उपाध्यक्षा हेमलता राऊत, संघाचे कार्यकारी विश्वस्त सुरेश वर्तक* या मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. ट्रस्ट च्या गायन वर्गातील कलाकारांच्या स्वागत गीताने कार्यक्रमात रंग भरण्यास सुरुवात झाली. प्रस्ताविकात *चेअरमन नितीन म्हात्रे* यांनी संस्थेच्या उपक्रमांची रेलचेल विषद केली.*विश्वस्त संदेश वर्तक* यांनी *मा. डॉ कोष्टी सरांची* यथोचित ओळख करून दिल्यानंतर चेअरमन नितीन म्हात्रे यांच्या हस्ते त्यांचा व *अध्यक्ष सुरेश चौधरी* यांचा विठ्ठल रुक्माई ची मूर्ती, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. आम्हा सर्वांचे गुरु *श्री जगदीश राऊत* यांच्या आज वाढदिवस,हा दुग्धशर्करायोग साधून मा. डॉ.कोष्टी सरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांना उदंड आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विविध जाती धर्माच्या 55 शिक्षकांचा ऋणनिर्देश कृतज्ञतापूर्वक पार पडल्यानंतर उत्तर देताना सिस्टर रिटा डाबरे यांनी समाजमंदिर चे आभार मानले. सौ सुजाता कवळी यांच्या सुमधुर वाणीतून शिक्षक व समाज मंदिराप्रती आदर व्यक्त करत असताना मंत्रमुग्ध झाल्यासारखं वाटलं.सौ. संध्या पाटील यांनी भविष्यात समाजमंदिरच्या कोणत्याही उपक्रमास मी सदैव उपस्थित असेल याची ग्वाही दिली. डॉ.कोष्टी सरांनी मनोगत व्यक्त करताना शिक्षक हे एक *रूप* आहे आणि ते रूप जेव्हा विद्यार्थ्यांच्या हृदयात कोरल जाईल तेव्हा विद्यार्थी त्या रूपाला डोळ्यासमोर ठेवून स्वतःची उन्नती करेल. प्रत्येक शिक्षक हा आयुष्याच्या अंतापर्यंत शिक्षक असतो, शिक्षक ही समाजाला फार मोठी देणगी लाभली आहे. आमच्या शासकीय कामात देखील शिक्षक खूप सहकार्य करीत असतात आणि त्यांच्या सहकार्यावरच आम्ही अनेक शासकीय उपक्रम तळागाळापर्यंत पोहोचवू शकतो. समाज मंदिर वास्तू तहसील कार्यालयासाठी नेहमीच उपलब्ध असते याबद्दल देखील त्यांनी आभार मानले. अध्यक्षीय भाषणात सुरेश चौधरी सर हे देखील हाडाचे शिक्षक असल्यामुळे आताचे विद्यार्थी आणि पूर्वीचे विद्यार्थी यामधील फरक जाणून शिक्षकांना सेवा द्यावी लागते, याबद्दलचे सुंदर विवेचन केले. *मॅनेजींग ट्रस्टी केवल वर्तक* यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले . सौ.प्रणोती पाटील यांनी सुमधुर आवाजात पसायदान गायल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन *सौ. सेजल वर्तक व सौ. आरती चौधरी* यांनी केले. अनेक समाज बांधव कार्यक्रमास उपस्थित होते तर सर्व विश्वस्तांनी हा कार्यक्रम योग्य रीतीने पार पडण्यास सहकार्य केले धन्यवाद! *नितीन केशव म्हात्रे* *चेअरमन* केवल रघुनाथ वर्तक मॅनेजिंग ट्रस्टी *समाज मंदिर ट्रस्ट, वसई*