 
                            सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नत्ती संघ शाखा आगाशी व उंबरगोठण यांच्या संयुक्त विद्यमाने आणि संघाच्या कला व सांस्कृतिक समितीच्या सहकार्याने आयोजित, मंगळागौर स्पर्धेचे दुसरे पर्व रविवार दिनांक १० ऑगस्ट २०२५ रोजी प्रभूदास शहा सभागृह, काशिदास घेलाभाई हायस्कुल आगाशी येथे पार पडले. कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. अमृता अतुल चोरघे या उपस्थित होत्या तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. नरेश सावे यांनी भूषविले. मंगळागौर स्पर्ध्येच्या परीक्षिका म्हणून सौ. मधुरा परांजपे आणि सौ. प्राची रानडे या उपस्थित होत्या. सदर मंगळागौर स्पर्धेस संघाचे आजी माजी पदाधिकारी, आगाशी शाखेचे अध्यक्ष श्री. अतुल पांडुरंग वर्तक, चिटणीस श्री. अजय अनंत कवळी, उंबरगोठण शाखेचे अध्यक्ष श्री. काशिनाथ मोरेश्वर राऊत, चिटणीस सौ. संगिता रमेश राऊत, संघाचे जेष्ठ चिटणीस श्री. प्रफुल्ल दामोदर म्हात्रे, कला व सांस्कृतिक समिती प्रमुख श्री.विनय जनार्दन पाटील, समन्वयक सौ. सुलंजना चंद्रकांत सावे तसेच कला व सांस्कृतिक समितीचे सर्व सदस्य, आगाशी व उंबरगोठण शाखेच्या प्रतिनिधी मंडळाचे सर्व सदस्य, माजी पदाधिकारी, श्री. विहंग कवळी, कु. अदिती कवळी यांच्यासोबतच आगाशी शाखेची सोशल मीडिया टीम यांचे मोलाचे सहकार्य लाभले. मंगळागौर स्पर्धेमध्ये कोरे, माहीम, चिंचणी, आगाशी, बोर्डी, वाणगाव या शाखांनी सहभाग घेतला होता. प्रथम क्रमांक हिरकणी संघ, माहिम यांनी पटकावला तर फायर फ्लाइस, चिंचणी यांनी द्वितीय आणि गौरांगी ग्रुप बोर्डी यांनी तृतीय क्रमांक पटकावला. सदर कार्येक्रमास समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद लुटला. तसेच, YouTube Live च्या माध्यमातूनही बहुसंख्य लोकांनी स्पर्धेचा आस्वाद घेतला. स्पर्धांच्या निमित्ताने दादर येथील वास्तूच्या पुनर्बांधणी साठी प्रत्यक्ष निधी संकलन झाले. तसेच प्रत्यक्ष कार्यक्रमात आणि YouTube Live वर सुद्धा आपण निधी संकलना साठी आवाहन करून, अनेकांच्या मनात देणग्या देण्याची इच्छा निर्माण केली व आपल्या उद्दिष्टपूर्तीं च्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. सर्व समाजबांधवांना मनःपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा!
 
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                