वसई तालुका कला क्रीडा महोत्सव 2023 कला विभागातील नाट्य स्पर्धेत सोमवंशी क्षत्रिय समाज खुंतोडी शाखेतर्फे स्पर्धेत उतरलेल्या 'बुढ्ढी के बाल' ह्या बालनाट्याला उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले. तसेच लेखनासाठी द्वितीय पारितोषिक, प्रकाश योजनेकरिता तृतीय पारितोषिक, नेपथ्य तृतीय पारितोषिक, उत्कृष्ट अभिनया करता नम्रता जितेंद्र वर्तक द्वितीय पारितोषिक व दैवी मकरंद सावे उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले. सर्व टीमचे व बालकलाकारांचे, पालकांचे तसेच लेखिका ईशानी वर्तक व दिग्दर्शक अधिराज कुरणे या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. सदर नाटक हे जानेवारी 2024 मधे होणाऱ्या राज्य बालनाट्य स्पर्धेत सहभागी होणार आहे. याबद्दल जनसमाजात बालकलाकारांचे कौतुक होत आहे.