 
                            सोमवंशी क्षत्रिय समाजोनती संघ, कला सांस्कृतिक समिती व केळवे शाखा यांच्या सहकार्याने शनिवार दि. २८ जून २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता अण्णासाहेब वर्तक आरोग्यधाम व भाऊसाहेब वर्तक विश्रामधाम येथे 21 लिटिल चॅम्प सह फुलझाडे लावण्याचा कार्यक्रम पार पडला. मुलांना तसेच त्यांच्या पालकांना आणि समिती सदस्यांना या उपक्रमाची ओळख व्हावी. आरोग्यधाम व विश्रामधामचे काम कसे चालते हे कळले. या कार्यक्रमासाठी केळवे पोलिस स्टेशनच्या गोस्वामी मॅडम पाहुण्या महणून उपस्थित होत्या. विश्रामधाम समितीचे प्रमुख हेमंत चौधरी व त्यांची संपूर्ण टीम तसेच आरोग्यधामचे पंकज म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण टिम या क्रार्यक्रमासाठी उपस्थित होती. संघाचे चिटणीस विविध पाटील यांनी लिटिल चॅम्प स्पर्धेतील मुलांना मार्गदर्शन केले. फुलझाडे लावतांना प्रचंड पाऊस असतांना ही मुलांचा उत्साह दांडगा होता. सर्व उपस्थितांना हर्षल राऊत व त्यांच्या सहकार्यांनी नाश्ता दिला. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आली. आदेश राऊत, विनय पाटील, हेमांगी सावे,लक्ष्मीकांत पाटील व बबन चुरी, बावडा यांनी फुलझाडे भेट दिली. सो. क्ष. स. संघांच्या पदाधिकार्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. आभाराने कार्यक्रमाची सांगता झाली.
 
                                 
                                 
                                 
                                