 
                            पालघर शिवसेना महिला आघाडी, पालघर जिल्हा, आयोजित मंगळागौर स्पर्धेत माहीम हिरकणी ग्रुप प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल सर्वाचे खूप खूप अभिनंदन. गेल्या महिन्यातही तुम्हाला विरारमधील मंगळागौर स्पर्धेत पहिले बक्षीस मिळाले होते. सर्व महिलांची अथक मेहनत आहे. सलग तीन वेळा प्रथम क्रमांक मिळवला आहे. हिरकणी ग्रुप माहीम शाखेचे नाव सुद्धा मोठे करत आहेत. ह्या महिला घर,व्यवसाय,नोकरी सांभाळून रोज रात्री सराव करतात. खरंच कौतुकास्पद आहे. सर्व सहभागी महिलांचे आणि त्यांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या हितचिंतकांचे मनःपुर्वक अभिनंदन आणि पुढील यशस्वी वाटचाली करिता हार्दिक शुभेच्छा!🌹💐
