 
                            आपल्या माननीय मनिषा ताई चौधरी यांनी आयोजित केलेल्या श्रावणोत्सव 2025 हा कार्यक्रम प्रबोधनकार ठाकरे ऑडिओटेरियम येथे झाला. या कार्यक्रमात एकवीरा महिला मंडळ दहिसर मधून दुसऱ्यांदा सख्यांनी भाग घेतला. विद्या सावे आणि कृपाली म्हात्रे यांच्या बरोबर सर्व ज्येष्ठ महिलांचा ग्रुप यात सहभागी झाला होता. रंजना सावे, रंजना राऊत, प्रतिक्षा सावे, सरोज पाटील, रश्मी पाटील, जयश्री वर्तक आणि सुनिता वर्तक या महिलांचा सहभाग होता. वयाची मर्यादा झुगारून आणि तरुणांना पण लाजवेल असा नाच सर्वांनी केला. एकवीरा देवीच्या आशीर्वादाने सर्व छान झाले. खरंच या वयात असा मोठा स्टेज मिळणे आणि त्याचा आपण लाभ घेणे हे नशिबातच असावे लागते. एकवीरा मातेकी जय 🙏🏻
 
                                 
                                 
                                
तरुणींना लाजवेल असा परफॉर्मन्स झाला.खूपच छान.ह्या ग्रूपचे हार्दिक अभिनंदन👍👍