 
                            आपल्या सोक्ष समाजातील आदरणीय बालरोगतज्ज्ञ डॉ. (सौ.) शकुंतला चुरी यांचे सुपुत्र नीरज चुरी निर्मित मराठी फीचर फिल्म “साबर बोंडं” नुकतीच महाराष्ट्रासह संपूर्ण भारतभर प्रदर्शित झाली आहे. साबर बोंडं हा पहिला भारतीय आणि एकमेव मराठी चित्रपट आहे ज्याने जागतिक स्तरावर अत्यंत मानाचा सनडान्स फिल्म फेस्टिव्हलचा ग्रँड ज्युरी पुरस्कार मिळवला आहे. या वर्षी या महोत्सवासाठी तब्बल १७,००० नामांकने आली होती. तसेच साबर बोंडं हा ऑस्कर नामांकनासाठी भारतातून निवडलेल्या २४ चित्रपटांपैकी एक आहे. नागराज मंजुळे ,सई ताम्हणकर, निखिल अडवाणी,विक्रिमादित्य मोटवानी हे चित्रपटाचे सादरकर्ते आहेत या चित्रपटाचा गाभा म्हणजे दोन मित्रांमधील हळूहळू उलगडत जाणारे प्रेम—एक संवेदनशील आणि वेगळ्या पार्श्वभूमीवर आधारित कथा. निर्माता नीरज चुरी व चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक रोहन कनवडे यांच्या संवेदनशील आणि प्रामाणिक कथनशैलीचे विशेष कौतुक होत आहे.
 
                                
अभिमानास्पद कामगिरी ! आपले हार्दिक अभिनंदन !!