 
                            महिला शक्ती एकविरा महिला मंडळ दहिसर शाखेच्या महिला सभासदांनी दादर येथील इमारत पुनर्बांधणी प्रकल्पासाठी ₹135000/- (एक लाख पस्तीस हजार रुपये) रुपयांचा निधी गोळा केला. गीतांजली गार्डन, दहिसर येथे आयोजित केलेल्या समारंभात ₹135000/– निधी श्री प्रभाकर ठाकूर, अध्यक्ष, निधी संकलन समिती, श्री. प्रमोद पाटील खजिनदार सो क्ष संघ, सौ रजनी राऊत , चिटणीस सो क्ष संघ, यांच्याकडे सुपूर्द केला . या सभेस एकविरा महिला मंडळाच्या 15 महिला उपस्थित होत्या . यापूर्वी दिलेली रक्कम ₹15,000/- व आत्ताची रक्कम मिळून एकूण 1,50,000/- ही रोख रक्कम आत्तापर्यंत संघाच्या हवाली केली आहे. माननीय प्रमोद पाटील व प्रभाकर ठाकूर यांनी फार छान माहिती दिली. प्रोजेक्ट विषयी ते बोलले. निधी जमा करताना लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यांनी सर्व गोष्टी नीट समजावून सांगितल्या. समाजाच्या कार्य पद्धतीची जवळून ओळख झाली. तसेच अनेक नवीन गोष्टी समोर आल्या. खरंच आपण अशा प्रगत समाजाचा भाग आहोत ही अभिमानाची गोष्ट आहे. दादर येथे गेल्यावर तेथील इमारतीकडे पाहताना मनातल्या मनात ही इमारत आपण बांधलेली आहे अशी स्वतःची मिश्किल प्रशंसा प्रत्येकजण करणार. खार होती म्हणून दोन मोठ्या दगडातील पोकळी भरली जात होती. आपण खारीचा वाटा सहज बोलून जातो पण खारीचा वाटा महत्वाचा होता नाहीतर दगड डगमगले असते. अशा खारीच्या वाट्याचा अभिमान आपल्याला कायम राहील. 🙏🏻 एकवीरा महिला मंडळ दहिसर
 
                                 
                                 
                                