 
                            ✨ क्षात्रसेतू दिवाळी अंक २०२५ ✨ सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाचे मुखपत्र असलेल्या क्षात्रसेतू दिवाळी अंक 2025 चा प्रकाशन सोहळा रविवार, दिनांक 5 ऑक्टोंबर 2025 रोजी वसई विरार शहर महानगरपालिका इमारत, विरार पूर्व येथे वाडवळ गीताने प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न झाला. या सभारंभाचे अध्यक्षस्थान संघाचे उपाध्यक्ष डॉ. नरेश सावे यांनी भूषविले. या समारंभास डॉ. दीपक चौधरी, मुख्य विश्वस्त सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघ फंड ट्रस्ट हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या समारंभास सुरेश वर्तक कार्यकारी विश्वस्त, श्री प्रभाकर वर्तक अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघ विरार, संघ पदाधिकारी व क्षात्रसेतू समितीचे पदाधिकारी सदस्य तसेच अनेक समाजबांधव उपस्थित होते. यावेळी संघाचे अध्यक्ष व क्षात्रसेतूचे संपादक श्री भाईसाहेब राऊत यांचा संदेश वाचण्यात आला. 🌟 सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाच्या क्षात्रसेतू अंकामुळे वाचन संस्कृतीला बळ मिळाले आहे. दिवाळी ही केवळ फराळ, फटाके व आनंद सोहळ्यापूर्ती मर्यादित नसून क्षात्रसेतू अंकाच्या माध्यमातून ज्ञान, विचार, साहित्य व संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याची संधी आहे. ✨ तरी दिवाळी सण हा क्षात्रसेतू दिवाळी अंकाच्या साथीने आनंददायी बनवा. ✨ पूजा अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिराचा पुनर्बांधणी प्रकल्प एप्रिल 2026 रोजी नवीन वास्तूचे उद्घाटन होईल यामुळे समाजाचे भवितव्य घडणार आहे त्यासाठी प्रत्येक सदस्याचा सहभाग व उदार दान आवश्यक आहे. क्षात्रसेतू दर्जेदार दिवाळी अंकाचे कार्यकारी संपादक श्री रामकृष्ण पाटील व त्यांच्या टीमचे मनःपूर्वक अभिनंदन. अंक अवश्य खरेदी करा; वाचा आणि अभिप्राय द्या. पुढील अंकात तुमचेही साहित्य समाविष्ट असावे यासाठी तयारी करा. साहित्यिक व्हा — असे प्रतिपादन मान्यवरांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अम्रिता सावे, पाहुण्यांची ओळख नमिता पाटील, प्रास्ताविक संगीता पाटील, फोटोग्राफर तन्वेश म्हात्रे व आभार प्रदर्शन नंदकुमार वर्तक यांनी केले. 📞 जगन्नाथ पाटील 📱 8976363543
 
                                 
                                 
                                