दिनांक 19/8/2024 सोमवार नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था पालघर जिल्हा वसई तालुका विरार पूर्व घरोघरी वृक्ष रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित केला होता . पर्यावरणाच्या रक्षणासाठी आता नागरिक पुढे येत आहे. त्यासाठी अनेक उपक्रम राबवत आहेत. असाच एक उपक्रम नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेने विरार पूर्वला राबवला आहे. घरोघरी वृक्ष रक्षाबंधन कार्यक्रम घेण्यात आला. त्या वेळी वसई तालुका सचिव शुभांगी राऊत, वसई तालुका संघटक रेखा चोरघे, अलका चोरघे या तिन्ही महिला पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी झाडांना आरती करून राखी बांधली. काही घोषवाक्य वृक्ष रक्षाबंधना निमित्ताने म्हटली जसे की राखी बांधून वृक्षरोपणाने करू सण साजरा जणू रक्षाबंधन आगळावेगळा अशी अनेक घोषवाक्य म्हणून वृक्ष रक्षाबंधन घराजवळील झाडा सोबत साजरे केले अशाप्रकारे खूप छान वृक्ष रक्षाबंधनचा कार्यक्रम खूप आनंदाने पार पडला.