सुहास परशुराम राऊत यांना डॉ. मणिभाई देसाई मानव सेवा ट्रस्टचा, 'भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल- हिंदूरत्न पुरस्कार २०२५' पालघर जिल्ह्यातील चिंचणी गावाचे सुपुत्र सुहास परशुराम राऊत यांना साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक वाटचालीनिमित्त मणिभाई मानव सेवा ट्रस्ट - निती आयोग संलग्नीत संस्थेच्या वतीने 'भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल- हिंदूरत्न पुरस्कार २०२५' प्रदान करण्यात आला. नामदार राधाकृष्ण विखे पाटील- जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र राज्य, मेधाताई कुलकर्णी- खासदार, पुणे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना सन्मानित करण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती निमित्त दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी लोकशाहिर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन, येरवडा- पुणे या ठिकाणी हा सोहळा संपन्न झाला.