सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघ या संस्थेचे (पाचकळशी-वाडवळ या जाती साठी) स्वतंत्र ॲप सोक्ष संघ चे माननीय अध्यक्ष श्री नरेश जनार्दन राऊत यांच्या शुभहस्ते बुधवार दि. एक नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता संघ कार्यालय केळवे रोड येथे प्रकाशित झाले. आज 4 नोव्हेंबरला फक्त तीन दिवस झाले आणि तीन दिवसात SKS Connect वर रेकॉर्ड ब्रेकिंग 1000 पेक्षा जास्त सदस्य नोंदणी केली गेली आहे. सर्व समाज बांधव या अॅपबद्दल रोमांचित आहेत आणि ते सर्व या अॅपचा अधिक फायदा घेण्यासाठी उत्सुक आहेत.