पालघर जिल्ह्याचा अभिमान! 🌟 माहीम - पाटे आळी येथील कु. दिविजा अश्विनी भावेश पाटील हिने फेब्रुवारी २०२६ मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे आयोजित इयत्ता ५ वी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (CBSE/ICSE व इतर अभ्यासक्रम) मध्ये पालघर जिल्हा गुणवत्ता यादीत १२ वा क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. दिविजा ही श्री एस. टी. कदम विद्यालय, पालघर येथील विद्यार्थिनी असून, तिच्या या उज्ज्वल यशामुळे शाळा, पालक, शिक्षक आणि संपूर्ण माहीम परिसराचा अभिमान उंचावला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल कु. दिविजा हिचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐 तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा व उज्ज्वल भवितव्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 🌹