अभिनंदन! 💐 सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट क्षेत्रातील आपल्या ज्ञानाचा ठेवा अधिक समृद्ध करत, आधीच्या ६ पुस्तकांनंतर आणखी ३ नवीन पुस्तके प्रकाशित केल्याबद्दल सुजल चौधरी-देवाळे यांचे मनःपूर्वक अभिनंदन! त्यांची नवीन पुस्तके— 📘 How to Code Any Feature? (Edition 2) – कोणतीही कल्पना प्रभावी डिजिटल टूलमध्ये कशी रूपांतरित करावी याचे मार्गदर्शन. 📗 Building with AI: Engineering without Debt – भविष्यातील तांत्रिक अडचणी टाळत AI चा प्रभावी वापर करून प्रोजेक्ट्स कसे विकसित करावेत यावर मार्गदर्शन. 📙 Rebuilding the SDLC for Probabilistic AI – AI च्या सतत बदलणाऱ्या स्वरूपाशी जुळवून घेण्यासाठी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रक्रियेत आवश्यक बदल स्पष्ट करणारे पुस्तक. ज्ञान, संशोधन आणि नवकल्पनांच्या माध्यमातून सॉफ्टवेअर क्षेत्रात दिलेल्या या मोलाच्या योगदानाबद्दल सुजल चौधरी-देवळे यांचे हार्दिक अभिनंदन! त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांना भविष्यातही असेच यश, सन्मान आणि उत्तुंग कार्य साध्य होवो, हीच सदिच्छा. :::