🌺 आदर्श सरपंच प्रिती पाटील यांचे अभिनंदन 🌺 कोकण सन्मान पुरस्कार सोहळा २०२६ अंतर्गत ग्रामपंचायत माहिम (पालघर) यांच्या सरपंच सौI. प्रीती अरुण पाटील यांचा “आदर्श सरपंच” म्हणून गौरव करण्यात आला. दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी गडकरी रंगायतन, ठाणे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत हा दिमाखदार सत्कार सोहळा पार पडला. महाराष्ट्र तसेच कोकणातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात आले. ग्रामविकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला असून, माहिम ग्रामपंचायत तसेच संपूर्ण परिसरासाठी ही अभिमानाची बाब आहे. सौ. प्रीती अरुण पाटील यांचे अभिनंदन व त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छां . 🌟💐