एडवणसारख्या ग्रामीण भागातून आपल्या मेहनतीने, जिद्दीने आणि कल्पकतेने ‘लक्ष्मी मसाले’ या उद्योगाची यशस्वी वाटचाल घडविणाऱ्या सौ. अस्मिता चौधरी यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत जिल्हा उद्योग केंद्रातर्फे ‘महिला उद्योजक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. पवई येथे झालेल्या सत्कार समारंभात त्यांचा सन्मान करण्यात आला, ही संपूर्ण एडवण परिसरासाठी आणि आपल्या पालघर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. घर-संसाराची जबाबदारी सांभाळत उद्योग क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अस्मिताताईंची ही यशोगाथा अनेक महिलांसाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरणारी आहे. त्यांच्या कष्टांना मिळालेली ही शाबासकी निश्चितच त्यांच्या पुढील यशाची नवी प्रेरणा ठरेल. *या मानाच्या पुरस्काराबद्दल सौ. अस्मिता चौधरी यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील उज्ज्वल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! 💐💐*