माहीम -पंगळदार येथील कु. दर्श जुईता तुषार राऊत ह्याने फेब्रुवारी २०२६ मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे आयोजित इयत्ता ५ वी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (CBSE/ICSE व इतर अभ्यासक्रम) मध्ये पालघर जिल्हा गुणवत्ता यादीत १५ वा क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. दर्श हा सेंट जॉन इंटरनॅशनल स्कूल , पालघर येथील विद्यार्थी असून या उल्लेखनीय यशाबद्दल कु. दर्श चे मनःपूर्वक अभिनंदन! 💐 त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा व उज्ज्वल भवितव्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 🌹