पालघर तालुक्यातील केळवे येथील प्रा. अंकिता चंद्रकांत वर्तक यांना मुंबई विद्यापीठाची पीएचडी (विद्यावाचस्पती) पदवी प्राप्त झाली आहे. वर्तक यांनी 'पालघर तालुक्यातील औद्योगिकीकरणाचा ग्रामीण समाजजीवनावर झालेल्या परिणामांचा अभ्यास' या विषयावर संशोधन केले. मागील दोन दशकांत पालघर तालुक्यात झालेल्या बदलांचा औद्योगिकीकरणाशी असलेला संबंध, यांचे निष्कर्ष या संशोधनातून मांडण्यात आले आहेत. डॉ. रवींद्र घागस यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपला प्रबंध पूर्ण केला.