उमेळागाव - वसई येथील श्री मोहित दिलीप राऊत ह्यांना अमेरिकेतील मास्टर्स इन कम्युनिटी प्लॅनिंग ही पदवी प्राप्त… उमेळा येथील सामाजिक कार्यकर्ते श्री दिलीप राऊत ह्यांचे सुपुत्र श्री मोहित राऊत ह्यांना अमेरिकेतील सुप्रसिद्ध युनिव्हर्सिटी ऑफ सिनसिनाटीतुन मास्टर्स इन कम्युनिटी प्लॅनिंग ही पदवी प्रदान करण्यात आली. मोहितचे दहावी पर्यंतचे शिक्षण वसईतील म ग परुळेकर शाळेतून झाले. उच्च माध्यमिक शिक्षण वर्तक कॉलेज मधून झाले. पुढे मुंबईतील बळीराम हिरे कॉलेज मधून पाच वर्षांच्या अभ्यासक्रमातून बॅचलर ऑफ अर्चिटेक्ट ही पदवी मिळवली. परदेशातून गुणवत्ता धारक उच्च शिक्षण घेण्याची जिद्द बाळगून मोठया हिम्मतेने युनिव्हर्सिटी ऑफ सिनसिनाटी येथे प्रवेश मिळवला व शिष्यवृत्ती ही मिळवली. दोन वर्षं कालावधीच्या मास्टर्स इन कम्युनिटी प्लांनिंग हा अभ्यासक्रम यशस्वी पणे पूर्ण करून गुरुवारी रात्री १२.३० मिनिटांनी हा पदवीदानाचा समारंभ पार पडला. पुढे डॉक्टरेट करण्याचा मनोदय मोहितने व्यक्त केला. आपल्या ह्या यशाचे श्रेय मोहितने अगदी शाळेपासून ते आता पर्यंतच्या गुरुजनांना दिले आहे. मोहित व त्याच्या पालकांचे हार्दिक अभिनंदन व पुढच्या करकीर्दीस शुभेच्छा…