सोमवंशी क्षत्रिय समाज मंडळ, विरार आयोजित संस्कार शिबिर या शिबिरामध्ये पर्यावरण या विषयावर जास्त भर देऊन नवीन पिढीस निसर्गाची जवळीक साधता यावी म्हणून नेचर ट्रेल चे आयोजन पापडखिंडी डॅम ते पापडखिंडी, व बारोंडा देवी डोंगर विरार पूर्व येथे करण्यात आले शिबिरास उपस्थित सर्व बाल गोपाळ यांनी या नेचर ट्रेलचा मनमुराद आनंद लुटला व आलेल्या सर्व मुलांनी देशी वृक्षांचे वृक्षारोपण ही केले. तसेच नेचर ट्रेल नंतर श्री पराग जगन्नाथ चौधरी यांच्या गंगा भास्कर या फार्म हाऊस वर विविध पक्षांची व सापांची माहिती मुकेश सर यांनी छान प्रकारे मुलांना समजावून सांगितली व वनभोजनानंतर मुलांना रायफल शूटिंग करण्यासाठी देण्यात आले त्यासाठी सुहास सर व प्रणव राऊत. यांचे मोलाचे सहकार्य मंडळास लाभले. तदनंतर क्विज कॉम्पिटिशन घेण्यात आली त्यामध्ये डॉक्टर मितेश पाटील यांनी जनरल नॉलेज व मुकेश सरांनी पर्यावरण या विषयावर विविध प्रकारचे प्रश्न विचारले . योग्य उत्तर देणाऱ्या स्पर्धकास बक्षीस देऊन गौरवण्यात आले. त्यानंतर विविध गाण्यांवर मुलांनी नृत्य करून कार्यक्रमाची सांगता झाली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सोमवंशी क्षत्रिय समाज मंडळाच्या सौ .शुभांगी निलेश म्हात्रे,अध्यक्ष श्री.रजनीकांत आत्माराम राऊत,उपाध्यक्ष व श्री. निनाद नंदन पाटील,शिक्षण समिती प्रमुख व मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकारी सदस्ययांचा मोलाचा वाटा राहिला.......!!!! PC :- Jitesh VVartak