सोक्ष समाज महामंडळ, वसई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला बालनाट्य महोत्सव उत्साहात पार पडला. या महोत्सवात एकूण पाच बालनाट्यांचा समावेश होता. विविध शाखांमधील लहान कलाकारांनी आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. या महोत्सवात उमेळे शाखेच्या “शोध अस्तित्वाचा” या बालनाट्याने द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच, या नाटकातील उत्कृष्ट अभिनयासाठी कु. कश्यप दर्पण राऊत यांना विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या यशाबद्दल कश्यप आणि संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन! 🥳🎉