🚩 *मान. श्री संदेश जगन्नाथ वर्तक (उमेळे)* नी समाजसेवेचे संस्कार आपल्या वडिलांकडून घेतले असून, त्या परंपरेला आपण अत्यंत निष्ठेने पुढे नेत आहात. सतत सामाजिक कार्यात व्यस्त असतानाही, एखाद्याचा फोन राहिला तरी आठवणीने संपर्क (recall) साधण्याची आपली सवय आपल्या जिव्हाळ्याच्या आणि कर्तव्यदक्ष स्वभावाची साक्ष देते. *वाडवळ व पाचकळशी, म्हणजेच सोमवंशी क्षत्रिय समाज यांना योग्य ओळख मिळावी यासाठी तसेच ओबीसी आरक्षण, obc जातच प्रमाणपत्र मिळणे, त्याची पडताळणी होणे बाबत शासकीय कार्यालयीन स्तरावर कायम सातत्याने पाठपुरावा करत असता.* कोणी विचारो अथवा न विचारो, आपण सरकार दरबारी आणि न्यायालयीन प्रक्रियेत अखंड प्रयत्न करत राहता, ही आपली जिद्द आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी अत्यंत प्रेरणादायी आहे. सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघ च्या "ओबीसी हक्क समिती" वर आपण यशस्वी सेवा देत आहात. तसेच वसई, "सोक्ष समाज महामंडळाच्या" विविध उपक्रमांमध्ये आपण सातत्याने उपस्थित राहून प्रत्यक्ष मदत करत आला आहात. आपल्या या निस्वार्थ सेवाभावाचे हेच खरे फलित म्हणजे, *आपली मॅनेजिंग ट्रस्टीपदी झालेली निवड होय* *पुन्हा एकदा आपल्या या यशस्वी वाटचालीबद्दल हार्दिक अभिनंदन!* *आपल्या पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 🙏*