आगाशी (कवळीआळी) येथील डॉ. सौ. स्नेहल निनाद कवळी यांना आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती (Ph.D.) पदवी प्रदान करण्यात आली. त्यांनी “वाडवळ समाजाची बोली आणि लोकसाहित्याचा भाषिक अभ्यास” या विषयावर सखोल संशोधन केले असून, त्यांच्या या महत्त्वपूर्ण संशोधनकार्याची दखल घेत विद्यापीठाने त्यांना ही पदवी बहाल केली आहे. वाडवळ समाजाची बोलीभाषा, तिची वैशिष्ट्ये तसेच लोकसाहित्याचा भाषिक दृष्टीकोनातून केलेला अभ्यास हे त्यांच्या संशोधनाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले आहे. या यशामुळे आगाशी परिसरासह संपूर्ण वाडवळ समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. डॉ. सौ. स्नेहल निनाद कवळी यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक व संशोधनात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.