कांडलई वाडी, वसई येथील कु. वीरा दर्शित चौधरी हिने आज पालघर जिल्हा स्तरावरील किकबॉक्सिंग स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावले आहे. तिच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. लहान वयातच किकबॉक्सिंगमध्ये प्राविण्य मिळवणाऱ्या वीराचे भविष्यात जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे मोठे स्वप्न आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.