मुर्शिदाबाद (पश्चिम बंगाल) : भागीरथी नदीच्या तीव्र प्रवाहाला, कठीण नेव्हिगेशनला आणि प्रचंड मानसिक व शारीरिक आव्हानांना सामोरे जात केवल कुमार चौधरी यांनी 81 KM World’s Longest National Open Water Swimming Competition 2026 मध्ये तब्बल ८१ किलोमीटरचे अंतर यशस्वीपणे पूर्ण करून ऐतिहासिक कामगिरी केली. या स्पर्धेचे आयोजन पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथील भागीरथी नदीत करण्यात आले होते. प्रदीर्घ अंतर, नदीचा वेगवान प्रवाह आणि बदलत्या परिस्थितीमुळे ही स्पर्धा अत्यंत आव्हानात्मक मानली जाते. मात्र, जिद्द, चिकाटी, अथक मेहनत आणि मानसिक खंबीरतेच्या जोरावर चौधरी यांनी हे आव्हान यशस्वीपणे पूर्ण केले. ८१ किलोमीटरचे हे अंतर पूर्ण करत त्यांनी आपल्या नावावर अविस्मरणीय कामगिरीची नोंद केली आहे. त्यांच्या या यशामुळे जलतरण क्षेत्रात त्यांचे विशेष कौतुक होत असून, त्यांच्या जिद्दीचे आणि धैर्याचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल केवल कुमार चौधरी यांचे हार्दिक अभिनंदन! 💐🏆 त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!