शिरगाव : सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघ यांच्या कला व सांस्कृतिक समिती आणि शिरगाव शाखेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले “कलानुभव” शिबिर उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडले. शिबिरामध्ये विविध कला आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सहभागींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने शिबिराला विशेष यश मिळाले. शिबिराचा संपूर्ण जमाखर्च संघाच्या पदाधिकाऱ्यांसमोर सादर करण्यात आला. शिबिराचे नियोजन आणि अंमलबजावणी करताना समितीने काटकसरीचे धोरण अवलंबल्यामुळे खर्चातून रु. १५,०००/- इतकी शिल्लक रक्कम बचत झाली. ही रक्कम संघाच्या इमारत बांधणी निधीसाठी धनादेशाच्या स्वरूपात संघाकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी कला व सांस्कृतिक समितीचे सदस्य, शिरगाव शाखेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. समाजोपयोगी उपक्रमांबरोबरच संघाच्या विकासकामांसाठी योगदान देण्याचा आदर्श समिती आणि शाखेने या माध्यमातून घालून दिला असल्याचे उपस्थितांनी गौरवोद्गार काढले.