🌟 हार्दिक अभिनंदन डॉ. शर्वरी सागर पाटील! 🌟 आपल्या वसईतील (खुंतोडी, वासळई) येथील डॉ. शर्वरी सागर पाटील यांनी कम्प्युटर इंजिनिअरिंग (सायबर सिक्युरिटी) मध्ये आपली पीएचडी (PhD) यशस्वीरित्या पूर्ण केली आहे! 🎓💻 ही मानाची पदवी डॉ. शर्वरी यांनी डी. जे. संघवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, मुंबई विद्यापीठ मधून मिळवली असून त्यांच्या संशोधनाचा विषय "Designing a Phishing Attack Detection System using an Intelligent Approach" हा आहे. विशेष म्हणजे,त्यांचे हे शोधनिबंध आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्येही प्रसिद्ध झाले आहेत! 🌍📖 ही खरोखरच मोठी कामगिरी असून आपणा सर्वांसाठी खूपच अभिमानास्पद आहे. या उत्तुंग यशाबद्दल डॉ. शर्वरी यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.🎉💐👏