सोक्ष समाज महामंडळ, वसई यांच्या वतीने दिनांक 1 मे 2026 रोजी आयोजित करण्यात आलेला बालनाट्य महोत्सव उत्साहात पार पडला. या महोत्सवात एकूण पाच बालनाट्यांचा समावेश होता. विविध शाखांमधील लहान कलाकारांनी आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. या महोत्सवात खुंतोडी शाखेच्या “सोंगाड्या” या बालनाट्याने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच, या नाटकातील उत्कृष्ट अभिनयासाठी कु. दिवीज राऊत, नम्रता वर्तक, शार्वी वर्तक यांना विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या यशा मध्य खुंतोडी शाखेचे कुशल वर्तक , जया वर्तक, कविता वर्तक,प्राप्ती राऊत, ऋषी पाटील मेहल राऊत ह्यांनी तसेच पालकांनी विशेष योगदान दिले . दिग्दर्शक धनश्री देसाई आणि संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन.