नाट्यवेडा अक्षय' वयाच्या १२ व्या वर्षापासनं तो या क्षेत्रात काम करतोय. भाईंदर येथे शालेय शिक्षणा नंतर इंजिनीरिंग पर्यंत शिक्षण घेऊनही तो त्या क्षेत्रात रमलाच नाही.त्याचं पहिलं व्यावसायिक नाटक "यदा कदाचित". त्यानंतर बऱ्याच मराठी मालिका आणि मराठी सिनेमात त्याने भूमिका केल्या. मायलेक, कु.गंगुबाई नॉनमॅट्रिक, बाजीराव मस्तानी, क्राईम पेट्रोल, जय हो, भाकीत, सह्याद्री अंताक्षरी, पंचनामा, लक्ष्य, अस्मिता, नकळत सारे घडले, स्वराज्य रक्षक संभाजी, स्पेशल पोलीस फोर्स, रंग माझा वेगळा आणि बऱ्याच... यातील 'नकळत सारे घडले' या मालिकेसाठी डॉक्टर गिरीश ओक, सुनील तावडे यांच्या बरोबरच अक्षयला सहाय्यक अभिनेता म्हणून संस्कृती कलादर्पण पुरस्कार सोहळ्यात नामांकन देखील मिळालं होतं. तसेच "तृषार्त" हा त्याचा मराठी सिनेमा इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक फिल्म फेस्टिवल मध्ये सिलेक्ट झाला होता. तसेच २०२२ मध्ये आलेला "दगडी चाळ २" हा सिनेमा उत्तम चालला. जाहिरात, कार्टून आणि चित्रपटांसाठी तो डबिंग आणि व्हॉईस ओव्हर देत असतो. "लक्ष्य, क्राईम पट्रॉल, शौर्य" सारख्या मालिकेसाठी काही काळ त्याने कास्टिंग डिरेक्टर म्हणूनही काम केले आहे, नवोदितांना संधी दिली. त्याचं २०२१ मध्ये आलेलं इशारो इशारो में नाटक सुद्धा चांगलं गाजलं. आणि आता सफरचंद या गाजत असलेल्या नाटकात अक्षय आहे. नुकताच ५ नोव्हेंबर २०२३ ला "सफरचंद" नाटकाचा १०० वा प्रयोग सादर झाला. त्यासाठी त्याला आशुतोष गोवारीकरांकडणं सन्मानित करण्यात आलं. सफरचंद हे नाटक गेल्या ४० वर्षातलं तांत्रिक दृष्ट्या सर्वोत्कृष्ट नाटक आहे, यात २ भव्य फिरते रंगमंच आहेत, नेपथ्यकाराने हुबेहूब काश्मीर रंगभूमीवर उभं केलंय ,या वर्षीचे सर्वात अधिक २४ पुरस्कार सफरचंद नाटकाला मिळाले आहेत तसेच ३३ व्या व्यावसायिक राज्य नाट्य स्पर्धेत या नाटकाला प्रथम पुरस्कार मिळाला आहे. रंगमंचावर आपण सिनेमाच बघतोय अशी जादु सफरचंद या नाटकात आहे.