पालघर : पालघर तालुक्यातील वेढी-मांजुर्ली गावचे रहिवासी श्री. हर्षद प्रकाश पाटील यांना आधुनिक शेती आणि शेतीतील प्रयोगशीलतेसाठी २० वा वसंतराव नाईक कृषी प्रेरणा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. उच्च शिक्षित असलेल्या हर्षद पाटील यांनी पारंपरिक नोकरीच्या मागे न लागता आपल्या वडिलोपार्जित शेतीकडे लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. आधुनिक तंत्रज्ञान, नवीन कृषी पद्धती आणि प्रयोगशील दृष्टिकोनाचा वापर करून त्यांनी वर्षभर विविध हंगामांमध्ये भाजीपाला उत्पादनाला चालना दिली. शेतीकडे केवळ व्यवसाय म्हणून न पाहता आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत उत्पादनक्षम आणि प्रयोगशील शेती करण्याचा त्यांचा प्रयत्न आजच्या युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना मिळालेला वसंतराव नाईक कृषी प्रेरणा पुरस्कार हा त्यांच्या मेहनतीचा आणि कृषी क्षेत्रातील योगदानाचा गौरव मानला जात आहे. या पुरस्काराबद्दल श्री. हर्षद प्रकाश पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील कृषी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! :::