केळवे येथील अंबारे परिसरातील कु. सुप्रिया पराग वर्तक हिने १२ वी CET परीक्षेत 99.86 पर्सेंटाइल आणि JEE Mains मध्ये 99.72 पर्सेंटाइल गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे कुटुंबासह संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत, शिस्तबद्ध नियोजन आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर सुप्रियाने हे यश मिळवले आहे. CET सारख्या स्पर्धात्मक परीक्षेत इतके उच्च पर्सेंटाइल प्राप्त करणे हे तिच्या समर्पणाचे आणि कष्टाचे फलित मानले जात आहे. सुप्रियाच्या या यशाबद्दल तिचे पालक, शिक्षक, नातेवाईक आणि मित्रपरिवार यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिच्या यशामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार असून भविष्यातही ती अशीच उत्तुंग भरारी घेईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. कु. सुप्रिया पराग वर्तक हिच्या या उज्ज्वल यशाबद्दल हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 🌹🎉📚🏆