Home > Current Affairs > क्षात्रसेतू मार्च २०२६ अंकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

क्षात्रसेतू मार्च २०२६ अंकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

loading...
क्षात्रसेतू मार्च २०२६ अंकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

काल आंतरराष्ट्रीय महिला दिनी आपल्या सो क्ष संघाच्या क्षात्रसेतू अंकाचे वसई तील मुळगाव, केरेपोंडे येथे दिमाखदार समारंभात प्रकाशन झाले. प्रकाशन सोहळ्यास सो. क्ष. स. संघाचे मा. उपाध्यक्ष व कार्यक्रम अध्यक्ष, डाॅ. श्री नरेश सावे, कार्यकारी विश्वस्त मा. श्री सुरेश वर्तक, विशेष अतिथी सौ. जोया वृषल चौधरी, संघ चिटणीस, मा. श्री प्रफुल्ल म्हात्रे, व मा. श्री विविध पाटील व इतर स्थानिक समाजसेवक व्यासपीठावर स्थानापन्न होते. संघाचे आणि प्रकाशन समारंभाचे अध्यक्ष आणि क्षात्रसेतूचे संपादक मा. श्री. भाईसाहेब राऊत तसेच फंड ट्रस्टचे मुख्य विश्वस्त आणि प्रकाशन समारंभाचे प्रमुख अतिथी मा. डॅा.दिपकभाई चौधरी अपरिहार्य कारणास्तव या समारंभास उपस्थित राहू शकले नाहीत.पण त्यांच्या शुभेच्छा मिळाल्या. त्यांच्या प्रेरणेने आणि सहकार्याने सदर प्रकाशन सोहळा उत्तमरित्या पार पडला. मा.भाईसाहेब आणि मा. दिपक भाई यांचे क्षात्रसेतू समिती मार्फत मनस्वी आभार!🙏🌹 प्रकाशन सोहळ्याला सुषमा राऊत मॅडम यांच्या बहारदार सूत्रसंचालनाने अतिशय रंगत आणली. क्षात्रसेतू अंक तयार करण्यासाठी आणि त्याला पूर्णत्व देण्यासाठी कार्यकारी संपादक मा. अध्यक्ष श्री रामकृष्ण पाटील यांनी अथक परिश्रम घेतले आहेत यावेळी एक हाती संपूर्ण धुरा त्यांना पेलली आहे .आपल्या क्षात्रसेतू समितीचे कार्यवाह स्व. विकास वर्तक यांच्या दुःखद निधनामुळे सर्वस्वी जबाबदारी श्री रामकृष्ण पाटील यांच्यावर पडली होती. त्यांनी सर्वांना सोबत घेऊन कामाचे अतिशय उत्कृष्टपणे नियोजन करून सर्वांवर त्यांच्यातील कला कौशल्य आणि गुण ओळखून जबाबदारी विभागून दिली. त्यांच्या ह्या नेतृत्व आणि व्यवस्थापन कौशल्यामुळेच आजचा प्रकाशन सोहळा अतिशय उत्कृष्टपणे संपन्न झाला. सरस्वती कवन सुमधुर स्वरात गायन करण्यात सहभागी झालेल्या समिती सदस्या सौ.लीना सावे, सौ.उज्वला पाटील,सौ.तृप्ती म्हात्रे,सौ.तन्वी म्हात्रे,आणि त्यांची छोटी कन्या कु.अक्षिति म्हात्रे यांचेही मनस्वी आभार! सौ.अम्रिता विकास सावे यांनी प्रकाशन सोहळ्याचे मनोवेधक प्रास्ताविक करून उद्देश स्पष्ट केला. प्रकाशन प्रसंगी कार्यकारी संपादक श्री रामकृष्ण यादव पाटील यांनी डॉ रखमाबाई सावे राऊत यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून वेचक शब्दांची गुंफण करून क्षात्रसेतू अंकाबद्दल मनोगत व्यक्त केले. सदर प्रकाशन कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून उपस्थित असणारे संघाचे उपाध्यक्ष मा. डॉ .नरेश सावे सर, प्रमुख अतिथी म्हणून जबाबदारी लीलया पेलणाऱ्या मा.डॉ .जोया वृषल चौधरी , आणि सो .क्ष स संघाचे कार्यकारी विश्वस्त मा.श्री सुरेशभाई वर्तक या त्रयींनी उपस्थितांचे उत्कृष्ट शब्दात उद्बोधन केले. समाज मंदिर पूर्णत्वास नेण्यासाठी श्रोत्यांना देणगीचे आवाहन यावेळी करण्यात आले. सो.क्ष.स. संघाचे चिटणीस मा. श्री प्रफुल्ल म्हात्रे ,वसई महामंडळ उपाध्यक्षा मा.हेमलताताई यांनी आजच्या महिलादिनी सर्व महिलांना शुभेच्छा देऊन कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. ह्या कार्यक्रमाला मोलाची साथ लाभली ती श्री आणि सौ.तन्वी म्हात्रे यांच्या दोघांच्या सहकार्याची! सौ उज्वला ताई रामकृष्ण पाटील यांचे बंधुराज श्री मिलिंद म्हात्रे आणि वहिनी सौ.तृप्ती म्हात्रे यांच्या प्रयत्नामुळे आणि सहकार्यामुळे आपल्या समितीला अजिबातच परिश्रम न करता उत्कृष्ट असे व्यासपीठ आणि बैठक व्यवस्था ,ती सुद्धा निसर्गरम्य वातावरणात आणि परिसरात उपलब्ध झाली. कार्यक्रम नियोजन इतके उत्तम होते की थंडगार कैरीचे पन्हे,अल्पोपहार आणि चहा अगदी योग्य वेळी दिला गेला.जाणकार श्रोते कार्यक्रमास लाभले हे आपल्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेचे फलित आहे. कृतज्ञतेचा आभार सोहळा कार्यवाह अम्रिता सावे यांनी खुमासदार शैलीत पार पाडला. वंदे मातरम् ह्या राष्ट्रीय गीताने सोहळ्याची सांगता करण्यात आली.ह्या प्रकाशन सोहळ्यात आपण सर्वांनी दिलेल्या योगदानाबद्दल आपले सर्वांचे मनस्वी आभार.🙏🏻🌹

loading...
loading...
loading...
loading...
Comments

Current Affairs

Category

Sports      Education      Weather      Entertainment      Politics      Business      Economics      Health      Sad Demise      Current Affairs      Festive      Achievements     
Recent News

logo
Download our app by clicking the link below :
logo logo
© 2024 SKS Connect | All Rights Reserved | Powered By OTET Infosystems