एकवीरा महिला मंडळ दहिसर अध्यक्षा विद्या सावे हिच्या बरोबर मिसेस श्रावणसुंदरी 2024, 1st रनरअप कृपाली म्हात्रे यांनी नृत्याची आखणी केली. यांना साथ देणाऱ्या सख्या रजनी राऊत (भारतमाता) रंजना सावे व रश्मी पाटील (पंजाबी) मिनल सावे व अमिता चौधरी (महाराष्ट्रीयन), कल्पलता पाटील व रंजना राऊत (गुजराथी), निमा सावे व प्रतिक्षा सावे (काश्मिरी), प्रिती वर्तक व लीना पाटील (दक्षिण भारतीय) अशा विविध प्रांतीय जोड्या बनवुन विविधता मे एकता दाखवली. आपल्या माननीय आमदार मनिषाताई चौधरी यांनी आयोजित केलेल्या श्रावनोत्सव २०२४ या कार्यक्रमात नृत्य आणि फॅशन शो सादर केला. वयाची 60 पुर्ण होऊन कार्यभार संपवून बरीच वर्षे उलटून गेल्यावर, पुन्हा एक नृत्य घेऊन स्टेज वर येताना त्यांच्या डोळ्यात आनंद व तेज होते. प्रत्येक जोडितील एक साथीदार निवृत्त आणि एक कार्यरत अशा जोड्या बनवल्या. मागचा एक महिना रोज भेट,सराव, फायनल तयारी व परफॉर्मन्स असा हा प्रवास खुप मजेत गेला. संध्याकाळचा नाष्टा व गप्पा एकत्र होत असत. भन्नाट परफॉर्मन्समुळे सर्वांचे खुप कौतुकही झाले.
खुपच सुंदर कार्यक्रम धम्माल आणि कमाल