सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, देमणभाट, चिंचणी येथील श्री गणेशोत्सव प्रसंगी आयोजित कार्यक्रमास प्रा. डाॅ. किरण सावे, तारापूर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी संघविश्वस्त श्री. अनिल भास्कर सावे यांनी उपस्थितांना संघवास्तूस देणगी देण्याचे आवाहन केले. त्यास प्रतिसाद देताना चिंचणीतील तरुण उद्योजक श्री. कुशल रमेश राऊत यांनी आपले वडील श्री. रमेश गोविंद राऊत यांच्या नावे रू. १,००,००० ची भरीव देणगी दिली. याप्रसंगी संघचिटणीस सौ. सुलंजना सावे, संघ स्थायी समिती सदस्या व चिंचणीच्या उपसरपंच सौ. आशा वर्तक, संघ क्षात्रसेतू संपादन समिती प्रमुख श्री. सुहास राऊत आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.