आपल्या वाडवळ समाजातील तीन तरुण शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रात एक महत्त्वाचं पाऊल उचलत स्वतःची पुस्तके प्रकाशित केली आहेत. ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. प्रा. प्रतिक प्रकाश राऊत (शाखा माकुणसार), प्रा. तेजस हरेश्वर चौधरी (शाखा नाळे), आणि प्रा. प्रियांक मधुकर वर्तक (शाखा एडवण) हे तिघेही VIVA Institute of Technology, Virar येथील Mechanical Engineering विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. १२ वर्षांचा औद्योगिक आणि शैक्षणिक अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. विशेष म्हणजे, प्रा. प्रतिक राऊत यांनी आतापर्यंत अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी एकूण १० पुस्तके प्रकाशित केली आहेत, तर प्रा. तेजस चौधरी आणि प्रा. प्रियांक वर्तक यांनी प्रत्येकी ३ पुस्तकांचे प्रकाशन केले आहे. मुंबई विद्यापीठाने अलीकडेच स्वीकारलेल्या NEP (नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण)2020 अंतर्गत नव्या अभ्यासक्रमानुसार, या जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात त्यांनी टेक्निकल पब्लिकेशन्ससोबत (Technical Publications) दुसऱ्या वर्षातील Mechanical Engineering आणि Computer Engineering विद्यार्थ्यांसाठी ही पुस्तके प्रकाशित केली आहेत. ही पुस्तके खालीलप्रमाणे आहेत: * यांत्रिकी आणि संबंधित अभियांत्रिकी शाखांसाठी: 1) अभियांत्रिकी गणित (Engineering Mathematics - III ) 2) मटेरियल सायन्स (Material Science) 3) थर्मोडायनामिक्स (Thermodynamics) 4) स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स (Strength of Materials) * संगणक आणि संबंधित अभियांत्रिकी शाखांसाठी: 5) गणित (Mathematics for Computer Engineering) ही केवळ आपल्या समाजासाठीच नाही, तर संपूर्ण परिसरासाठी गौरवाची बाब आहे. मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत सध्या ५० हून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालये कार्यरत आहेत, आणि त्या अंतर्गत शिकणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना या पुस्तकांचा लाभ होणार आहे. आपण सर्वांनी आपल्या समाजातील या तिघा यशस्वी युवकांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देऊया! संघ हीच शक्ती जय वाडवळ!
"मन:पूर्वक आभार! आपल्या समाजाचा असाच पाठिंबा आणि आशीर्वाद पुढेही आम्हाला मिळत राहो, हीच अपेक्षा."