*कु. हिमाली निखिलेश सावे, देहेरी यांना मिस पीस इंटरनॅशनल २०२५ मध्ये ' बेस्ट पीस स्पीच 'पुरस्कार* देहेरी गावातील आय. टी. इंजिनिअर कु. हिमाली सावे यांनी ८ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या *मिस पीस इंटरनॅशनल २०२५* या आंतरराष्ट्रीय ऑनलाइन सौंदर्य स्पर्धेत ' सर्वोत्कृष्ट शांतता भाषण ' (Best Peace Speech) पुरस्कार जिंकून देशाचा सन्मान वाढवला आहे. या स्पर्धेत त्यांनी टॉप १० स्पर्धकांमध्ये स्थान मिळवले. हिमालींचा सौंदर्य स्पर्धेतील प्रवास *मिस वाडवळ २०२३* या मुळगाव येथे झालेल्या स्पर्धेतून सुरू झाला. वाडवळ समाजाच्या पाठबळामुळे त्यांच्या कलागुणांना वाव मिळाला आणि त्यांचा आत्मविश्वास वाढला. त्या पुढे *मिस वाडवळ २०२४* ठरल्या. त्यानंतर त्यांनी सातत्याने मेहनत करीत *मिस ग्लोबल इंडिया २०२५* या स्पर्धेत *प्रथम उपविजेतेपद* मिळविले. ही स्पर्धा काशिश प्रॉडक्शन्सने आयोजित केली होती. आपले आजोबा, स्वर्गवासी लेफ्टनंट कर्नल प्रताप रघुनाथ सावे यांच्या सैनिकी सेवेमुळे प्रेरित होऊन हिमालीने जगभर शांततेचा संदेश पोहोचवणाऱ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे ठरवले. त्यानंतर त्यांची *मिस पीस इंडिया* म्हणून निवड झाली आणि त्यांनी *मिस पीस इंटरनॅशनल* मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेत त्यांनी टॅलेंट राऊंड, विविध पोशाखांतील रॅम्प वॉक, पर्यावरणविषयक आणि सामाजिक उपक्रम, मुलाखती आणि भाषणे अशा अनेक प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांच्या शांतताविषयक भाषणाची विशेष दखल घेण्यात आली आणि त्यांना ' बेस्ट पीस स्पीच ' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हिमाली सावे यांचे मनःपूर्वक अभिनंदन! त्यांच्या पुढील प्रवासासाठी सो. क्ष. समाजोन्नती संघातर्फे खूप खूप शुभेच्छा! नरेश जनार्दन राऊत अध्यक्ष सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघ