नमस्कार!🙏 आज सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाचा १०५ वा वर्धापन दिन सोहळा बोरिवली पश्चिम सो. क्ष. संघ शाखेतर्फे साजरा करण्यात आला. सो. क्ष. स. संघाच्या दिवंगत धुरीणींना विनम्र अभिवादन करून बोरिवली (प.) सो. क्ष. स. संघ शाखेचे पदाधिकारी, कार्यकारी सदस्य, सभासद आणि स्वामिनी महिला मंडळाच्या सर्व कार्यकारिणी सदस्या तसेच आपल्या या कार्यक्रमासाठी श्रीयुत दिनानाथ चौधरी हे सपत्नीक आले होते. या सर्वांनी आपली उपस्थिती दर्शवून सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यास सहकार्य केल्याबद्दल आपणां सर्वांचे समितीतर्फे मनःपूर्वक आभार. श्री. किरण पाटील शाखा अध्यक्ष. सौ. सुनिती पाटील शाखा चिटणीस. श्री. तरुल पाटील शाखा खजिनदार. आणि कार्यकारिणी समिती बोरिवली (प.) सो. क्ष. स.संघ शाखा.