 
                            वाडवळ फुटबॉल लीग- सीझन १ आगाशी गावातील मुलांनी विशेष करून तेजस कवळी, प्रितेश वर्तक, निहार कवळी, मयंक कवळी, आराध्य म्हात्रे, विहंग कवळी, वेदांत वर्तक, आदित्य पाटील, निमिष म्हात्रे (वसई), विशाल पाटील (बोर्डी) आणि त्यांच्या सोबत असलेले त्याचे मित्रमंडळी ह्यांनी रविवार दिनांक २५ मे २०२५ रोजी पहिल्यांदा वेगळे काही असे वाडवळ फुटबॉल लीग चे आयोजन केले होते. या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं होतं की, यामध्ये ८ संघांनी भाग घेतला होता, आणि खेळाडू बोर्डी, माहीम, सफाळे, बोरिवली, वसई, विरार अशा दूरदूरच्या ठिकाणांहून आले होते. स्पर्धा लीग फॉरमॅटमध्ये होती, त्यामुळे प्रत्येक संघाला अनेक सामने खेळायला मिळाले. सर्व खेळाडूंना आपली क्षमता दाखवण्याची संधी मिळाली आणि हा दिवस जरी थकवणारा होता, तरी तो आनंददायक आणि संस्मरणीयही ठरला. लहान-थोर मुलांना फुटबॉल खेळण्याचा अनुभव मिळाला आणि आपल्या समाजातील ज्येष्ठ सदस्यांनी प्रत्यक्ष फुटबॉल सामने पाहण्याचा आनंद घेतला. सामन्याचे आयोजन आणि नियोजन अतिशय सुदंर होते जेणे करून सर्व सामने अतिशय यशस्वी रित्या पार पडल्या. ह्या सामन्यात आगाशी एफ सी (आगाशी) विजेता ठरला. तर व्हाइटवॉकर एफ सी (बोर्डी) संघ उपविजेता ठरला. मयंक कवळी हा उत्कृष्ट गोलकीपर चा मानकरी ठरला. निमिष म्हात्रे ह्यांनी सर्वाधिक गोल करण्याचा पुरस्कार प्राप्त केला. तसेच अंतिम सामन्यात विशाल पाटील हा सामनाविराचा मानकरी ठरला. सर्व संघाचे व खेळाडूंचे खूप खूप अभिनंदन 💐
 
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                