सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाचा वार्षिक क्रीडा महोत्सवात दादर येथिल अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिरासाठी देणग्या देण्यात आल्या. वसईतील मांडलई शाखेतील होळी राऊत आळी या ठिकाणी पहिला क्रीडा महोत्सव स्व. भायजी जगू राऊत यांच्या पटांगणात संपन्न झाला होता. त्याच घरातील नयन राऊत, संकेत नयन राऊत, ममता संकेत राऊत आणि सारिका वैभव राऊत यांनी रुपये चार लाखाचा धनादेश संघाध्यक्ष नरेशभाई राऊत व विश्वस्त विलासबंधू चोरघे यांच्याकडे सुपूर्द केला.