दहिसर येथे ज्येष्ठ महिलांसाठी एकवीरा महिला मंडळ अध्यक्षा विद्या सावे यांनी सुरू केली आहे नृत्यशाळा. नेहमी तरुण महिलांसाठी नृत्य शिकण्याची संधी सर्वत्र उपलब्ध असते.ज्येष्ठांना त्यांच्या सौम्य हालचाली तसेच त्यांची प्रकृतीची बंधने यामुळे बाजूला केले जाते म्हणूनच दहिसर मध्ये सुरू केला आपल्या शाखेतील चिरतरुण अशा ज्येष्ट महिलांसाठी डान्स क्लास. अध्यक्षा विद्या सावे देखील त्यांच्या बरोबर मैदानात उतरल्या. सर्व महिलांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि दोन क्लासेस मधे एक सुंदर अशा गुढीपाडव्याच्या नृत्याने क्लासची सुरूवात झाली आहे. यांचा डान्स आपल्याला फेसबुक पेज वर पाहता येईल. https://www.facebook.com/share/r/1ABKjHoVrU/ आभारी 👍 सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 💐