सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाचा वधू-वर परिचय मेळावा वधू-वर परिचय मेळावावा पद्मश्री भाऊसाहेब वर्तक विश्रामधाम व श्रीमती इंदूताई वर्तक विश्रामधाम, केळवे रोड येथे उत्साहात संपन्न झाला. एकूण २०० जणांची उपस्थिती होती. कार्यक्रमास प्रमुख अतिथी अॅड. दिप्ती हितेश राऊत- समुपदेशक, विशेष अतिथी डॉ. सौ. सुनिता सुबेन पाटील- समुपदेशक, समाजसुधारक व संघाचे अध्यक्ष श्री नरेश राऊत- अध्यक्षस्थानी, विश्वस्त श्री अनिल सावे, सौ नमिताताई राऊत, सौ. रजनी राऊत संघ चिटणीस व समन्वयक, संघाचे पदाधिकारी या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. स्वागतगीत श्रीमती हंसा पाटील, कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री मनोहर म्हात्रे यांनी सादर केले. यावेळी सर्व उपवर मुला-मुलींचा परिचय दिल्यानंतर त्यांनी आपआपसांत भेटून चर्चा केली. अॅड. दिप्ती राऊत समाजामध्ये ३६ गुण जमले तरी घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे. यास्तव विवाहपूर्व एकत्रित चर्चा करणे गरजे आहे. याबाबत तडजोडीचा मार्ग साधणे, जेणेकरुन कुटुंब सुरक्षित राहिल तसेच विवाह शक्यतो समाजात करण्यात भर द्यावा अशा भावना व्यक्त केल्या. डॉ. सौ. सुनिता सुबेन पाटील विवाह संस्था केवळ पती-पत्नी यांच्याशीच संबंधीत नाही तर त्याचा परिणाम संपूर्ण समाजावर आणि भावी पिढ्यांवर होतो. इतर धर्मियात जरी हा कायदेशीर करार असला तरीसुद्धी हिंदूधर्मियामधील हा एक संस्कार आहे. पती-पत्नीमधील सहजीवन हे समर्पण व स्नेहाच्या धाग्यानी बांधलेले बंधन आहे. वंशवृद्धी हे विवाह संस्थेचे प्रथम प्रयोजन असले तरीसुद्धा दांपत्य प्रेम टिकवणे आणि संस्कृती संवर्धनाने विवाह संस्था मजबूत राहते. समाजाने राबवलेला हा उपक्रम त्यांच्या सामाजिक बांधीलकीची जाणीव करुन देत आहे असे मोलाचे मार्गदर्शन केले. OTET Infosystems चे संस्थापक श्री. अमेय राऊत यांनी SKS Connect App बद्दल सांगितले. समाजाला डिजिटल पद्धतीने आणण्याचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच त्यांनी सर्व पालकांना त्यांच्या मुलांची मॅट्रोमोनी मॉड्यूलमध्ये नोंदणी करण्याची विनंती केली. अध्यक्ष भाईसाहेब राऊत - वधू-वर पालक, समाजबांधव या सर्वांना समाजात चांगले विवाह व्हावेत म्हणून मोलाचे मार्गदर्शन लाभले. भविष्यात एकत्र या व आई-वडिलांना आनंद द्या, अशा भावना व्यक्त केल्या. वधू-वर समितीने कार्यक्रमाची चोख व्यवस्था ठेवली होती. सूत्र संचलन श्रीमती स्मिता वर्तक व श्री नितीन वर्तक यांनी उपस्थितांचे मनपूर्वक आभार मानले. चहापान व राष्ट्रगीतानंतर कार्यक्रमांची सांगता झाली.