हार्दिक अभिनंदन! आपले समाजबांधव श्री.राजेश रमाकांत वर्तक, माहीम (गिलगोडी) हे टाटा स्टील, तारापुर या कंपनी मध्ये कार्यरत आहेत. यांना सोमवार दिनांक १५ ऑक्टोंबर २०२४ रोजी कोल्हापूर येथील राजर्षी शाहू छत्रपती सभागृहात "समाज भूषण" पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले राजेश वर्तक यांनी अनेक सामाजिक कार्यामध्ये योगदान दिले आहे. औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक तसेच क्रिडा क्षेत्रात देखील उल्लेखनीय कार्य केले आहे. २०१९ साली कोल्हापूर येथे आलेल्या महापुराच्या वेळी पुरग्रस्तांना भरीव मदत केली होती. यापूर्वी राजेश वर्तक यांना टाटा स्टील कंपनीचा "स्पेशल शाब्बास" पुरस्कार, मुंबई ग्राहक पंचायतीचा "उत्कृष्ट कार्यकर्ता" पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा "गुणवंत कामगार" कल्याण पुरस्कार मिळाला आहे. तसेच महाराष्ट्र शासनाकडून "विशेष कार्यकारी अधिकारी" म्हणून नियुक्ती झाली आहे. आपल्या चतुरस्त्र कार्याबद्दल आपणास मिळालेल्या "समाज भूषण" पुरस्कारा बद्दल खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!
congratulations Dada 👍🏻