छोट्याश्या वेढी गावातील दोघी जणी, सौं. अमिता मनिष पाटील.. आणि सौं. निखिला शेखर म्हात्रे... एकाच दिवशी मोठ्या सन्मानास लायक ठरल्या.. मित्रांनो त्याआपल्यातच वावरतात. पण. त्यांच्या मधील प्रतिभा. आपण जाणून घेत नाही कारण पिकते तिथे विकत नाही ही जगाची रीत आहे, एकीने महाराष्ट्र प्राथमिक शाळेच्या मराठी पाठय पुस्तका ची लेखिका होण्याचा बहुमान मिळावीला, आपल्या लहान पणी पुस्तकातील कथा मन लावून. वाचल्यावर जेव्हा पुस्तकाच्या कव्हर वर लेखकाचे नाव कौतुकाने वाचतो.तेव्हा ह्या व्यक्तीला कधी आयुष्यात भेटता येईल का असे. वाटे... ती व्यक्ती आपल्यातच आहे.... दुसरी महाराष्ट्राचे उप मुख्य मंत्री श्री. अजितदादा पवार. ह्यांच्या हातून. पुरस्कार प्राप्त करणारी. आपली सौं. निखिला शेखर म्हात्रे.. ही एक खूप प्रतिभावान, अतिशय आत्म विश्वास ठासून भरलेली, आज T. V. 9 ह्या news चॅनेल वर जेव्हा स्वतःच्या नावाचा उच्चार करते.."मी निखिला" तो खूब आत्मविस्वासू वाटतो. आज समोर लाखो लोक T. V. बघत असतात... ह्याची जाणीव ठेऊनच तो बातमी वाचनाचा विशिष्ट ढब राखला. जातो.. इतकी वर्ष सतत लोकांच्या मनावर राज्य करणे, साधी गोष्ट नाही... तुम्ही दोघी आमच्या साठी मान बिंदू आहात... मित्रानो आपल्या ला अशी आदर्श निर्माण करणाऱ्या माणसांना जपायला हवं त्यांचा योग्य तो आदर करायला हवा, तरुण वयावर त्याचे चांगले परिणाम होतात.. असो दोघींचे खूप अभिनंदन, हे पुरस्कारांचे योग आयुष्यात पुन्हा, पुन्हा यावेत हिच सदिच्छा...🌹