कुमारी. सिद्धी नरेंद्र वर्तक, माहीम – विरार यांची Rentokil PCI तर्फे सन २०२५ सालातील “Certificate of Achievement” या पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!!! आपण Corporate – IT department कार्यरत असताना आपल्या कामात सातत्य, प्रामाणिकपणा व जबाबदारीची जाणीव ठेवून उत्कृष्ट कार्य केले आहे. आपल्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे व सहकाऱ्यांना वेळोवेळी दिलेल्या सहकार्यामुळे संघभावना अधिक दृढ झाली आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ व सहकाऱ्यांशी उत्तम समन्वय राखत, दिलेली जबाबदारी वेळेत व अचूकतेने पूर्ण करण्याची आपली तयारी आणि तत्परता विशेष उल्लेखनीय आहे. आपल्या उत्कृष्ट कामगिरीची व संस्थेप्रती असलेल्या निष्ठेची दखल घेऊन हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आपण या पुरस्काराचे मानकरी ठरलात, याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन! पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!