पालघर येथील पहिला वाडवळी खाद्य महोत्सव अत्यंत उत्साहात पार पडला. पालघरच्या जनतेने या महोत्सवाला दिलेला उस्फुर्त प्रतिसाद अभूतपूर्व होता. या महोत्सवात असंख्य खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावण्यात आले होते, जिथे विविध चविष्ट पदार्थांची मेजवानी होती. हजारो लोकांनी या महोत्सवाला हजेरी लावली आणि कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्व राजकीय, सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजकांचे मनःपूर्वक आभार! 🙏 यावेळी सो. क्ष संघ कमिटीने देखील उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.