बोर्डीच्या माहेरचा आमचा सावेंच्या लेकीसुना व बायभाऊंचे गोकुळ असे व्हाट्सअप गृप आहेत. ज्यावर आम्ही बहिणी भाऊ लेकी सुना भाचे मंडळी काही आत्यांची मुलं असे कायम एकमेकांच्या संपर्कात असतो. ह्याच व्हाट्सअप गृपचा समाजाच्या विधायक कार्यासाठी उपयोग करुन घ्यावा अशी संकल्पना मनात आली. आणि आपल्या सो क्ष स संघाच्या दादर येथील इमारत निधी संकलनासाठी ौ. वंदना कमलाकर चुरी. वाणगाव )आमच्या ह्या गृपवर आजीच्या नावाने देणगी गोळा करण्याचे आवाहन केले. रुपये 500/- पासून कितीपण द्या असे सांगितले. आणि तीन दिवसांत 51,000/-( एक्कावन्न हजार रुपये ) रुपयांचा निधी जमा झाला. ह्यासाठी माझ्या बहिणी, सौ. हंसा किशोर पाटील, श्रीमती.प्रतिभा वि. पाटील..ह्यांनी विशेष सहकार्य केले.ति. स्व. कै. श्रीमती. हिरीबाई बळवंत सावे, बोर्डी नेताजीरोड. ह्या आमच्या आजीच्या स्मरणार्थ सदर निधीचा चेक आपले अध्यक्ष, श्री. नरेशभाई व निधिसंकलन समिती सदस्या ह्यांचे हाती बोर्डी येथे सुपूर्द केला. ह्याच संकल्पनेचा आधार घेऊन, श्री. दिपक ज. राऊत. सौ. जयश्री किरण राऊत व इतरांनी,माझ्या मामाकडच्या गृपवरून सर्व नातवंडं, सुना पतवंडं ह्यांनी,आमची आजी ति. स्व. कै. श्रीम. बजुबाई वासुदेव राऊत, बंगली, बोर्डी.. हिच्या स्मरणार्थ व्हाट्सअप गृपवरुन 65,000/- पासष्ट हजार रुपयांचा निधी गोळा करुन, सो क्ष स संघाचे अध्यक्ष श्री. नरेशभाई राऊत यांच्याकडे सुपूर्द केला. आपण सगळे वैयक्तिक देणगी देत आहोत. पण आपल्या अशा नात्यागोत्याच्या गृपवरून थोडासा प्रयत्न केला तर फुल ना फुलाची पाकळी म्हणून प्रत्येक जण त्यात सहभागी होतो. आपल्या समाजाच्या वास्तू निर्माणासाठी संघ फंड ट्रस्टला निधीची अत्यंत आवश्यकता आहे. म्हणून प्रत्येकाने शक्य होईल ती मदत करावी. हिच विनंती. 🙏 सौ. वंदना कमलाकर चुरी वाणगाव. 8424926106