*सो.क्ष.वाडवळ क्रीडा प्रबोधीनी* व *सो. क्ष.स.संघ माकुणसार शाखा* यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या आणि *श्री. नरेश जनार्दन तथा भाईसाहेब राऊत, अध्यक्ष-सो.क्ष.स.संघ* यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु केलेल्या विनामुल्य प्रशिक्षण शिबीर व त्यासोबत वाडवळ कबड्डी स्पर्धा (पर्व1ले) शनिवार दि. 22 मार्च 2025 ठिकाण : जि.प.शाळा मैदान, माकुणसार, सफाळे येथे *श्री. प्रितम आप्पा म्हात्रे,* *उपाध्यक्ष सो.क्ष.स.संघ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले श्री. पंकज अरुण म्हात्रे, अध्यक्ष-सो.क्ष.स.संघ शाखा माकुणसार* यांच्या अध्यक्षतेखाली हि स्पर्धा घेण्यात आली. आगळा वेगळा उपक्रम करण्यासाठी *श्री. बबन केशव चुरी चिंचणी-बावडा* यांच्या नर्सरीतील गुलाबाची रोपे देऊन *श्री. भावेश लिलाधर म्हात्रे, चिटणीस* *सो.क्ष.स.संघ शाखा माकुणसार* व सो.क्ष.वाडवळ क्रीडा प्रबोधीनी मधिल असलेल्या सर्व सदस्यांच्या हस्ते आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. *जेष्ठ कबड्डीपटू श्री. सुधीर गणपत म्हात्रे, वेढी* यांच्या सहकार्याने तयार केलेल्या मैदानात सामने सुरु करण्यात आले . आजुबाजूच्या सर्व शाखांमधिल मान्यवरांची तसेच *माकुणसार ग्रामपंचायतचे सरपंच-उपसरपंच, केळवा सागरी पोलिस स्टेशनचे अधिक्षक* यांची ही या कार्यक्रमास उपस्थिती लाभली . समाजातील इतर शाखा अध्यक्ष, शाखा चिटणीस व समाज बांधव या स्पर्धेस उपस्थित राहून त्यांनी खेळाडूंना प्रोस्थाहित केले. जास्तीत जास्त शाखांनी आणि शाखेतील खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला . माकुणसार शाखेनी खेळाडु आणि पाहुणे यांच्या भोजनाची उत्तम व्यवस्था केली. माकुणसार शाखेतील *व्यावसायिक श्री. विशाल सुभाष वर्तक, सामाजिक कार्यकर्ते श्री. भुपेश रमेश म्हात्रे, संचालक दि.से.को.ऑप.क्रे.सो श्री. विलास पांडुंग सावे, योगगुरु श्री. अशोक भालचंद्र वर्तक, श्री . दिलेश भालचंद्र राऊत* या काही क्रीडा प्रेमीने पारितोषिके देऊन स्पर्धेस सहकार्य केले. अंतिम सामना झाल्या नंतर *श्री. नितीन दत्तात्रेय पाटील क्रीडा समिती प्रमुख* *सो.क्ष.स.संघ.* यांच्या हस्ते विजेत्या संघास पारितोषिक देण्यात आले . हे सुर्वणक्षण लक्षात रहावे यासाठी *मयुरेश चुरी* यांनी त्याच्या कॅमेरॅत टीपले. *सो.क्ष.वाडवळ क्रीडा प्रबोधीनीचे 2 रे पर्व येत्या दोन महिन्यात घेण्यात येईल* आणि अजुन जास्तीत जास्त संघ सहभागी होतील असे जाहिर करुन ज्यांनी ज्यांनी वेगवेगळ्या स्वरुपात सहकार्य केले त्यांचे आभार मानुन स्पर्धेची सांगता करण्यात आली. *आपण केलेल्या सहकर्याबद्दल सर्वांचे मनपुर्वक आभार!* *सो.क्ष.वाडवळ क्रीडा प्रबोधीनी* श्री. आतिश पाटील, कु. रक्षित पाटील, कु. आदेश राऊत, श्री. निकेश वर्तक, श्री. तेजस पाटील, कु. स्वागत पाटील, कु. कौशिक पाटील, श्री. विद्देश सावे, कु. भाविक वर्तक, श्री. पारस पाटील, कु. आकाश वर्तक, कु. निनाद सावे, कु. चैतन्य वर्तक.